* उद्योग नगरी मध्ये विश्वेश्वर बँकेचा नाविण्यपूर्ण कर्ज योजनेसह उद्योजक मेळावा संपन्न
दि विश्वेश्वर सहकारी बँकने पिंपरी चिंचवड या उद्योग नगरी मध्ये लघू उद्योजकांसाठी कर्ज मेळावा दि. 07.10.2025 रोजी MCCIA च्या भोसरी येथील कार्यालयामध्ये आयोजीत केला होता. विश्वेश्वर बँक ही पुण्यातील एक अग्रगण्य मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक असून, बँकेच्या 5 शाखा पिंपरी चिंचवड भागात आहेत. बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात असून, बँक एकूण 30 शाखांच्या माध्यमातून गेली पाच दशके निरंतर ग्राहक सेवा देत आहे.
बँकेचा मार्च 2025 अखेर एकूण व्यवसाय 3800 कोटी असून, बँकेला नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ़ इंडिया कडून शेड्युल्ड दर्जा प्राप्त झालेला आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या Financially Sound and Well Managed (FSWM) च्या सर्व निकषांची (Parameter) पूर्तता केली आहे. सातत्याने लाभांश देणारी बँक म्हणून बँकेची ओळख व वैधानिक लेखा परीक्षणात सातत्याने बँकेस 'A' ग्रेड आहे.
बँक सातत्याने विविध योजनेअंतर्गत ग्राहकांना कर्जपुरवठा करत असते, त्यामध्ये RBI ने घालून दिलेल्या निकषानुसार अग्रक्रम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे लागते. त्या अनुषंगाने लघुउद्योजकांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे.
त्यामुळे बँकेने लघुउद्योजकांसाठी MSME कर्ज मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्यास पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री. संदिप बेलसरे,सचिव श्री. जयंत कड, संत साई विद्यालयाचे संस्थापक श्री. शांतलिंग ढवळेश्वर सर व त्या भागातील प्रतिष्ठीत लघुउद्योजक, तरूण नवउद्योजक, चार्टर्ड अकौंटंट, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट उपस्थीत होते. तसेच बँकेकडून मा. संचालक श्री. रविंद्र महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हेमंत व-हाडपांडे, सरव्यवस्थापक श्री. मिलींद केळकर, श्री. राम दराडे व सहाय्यक सरव्यवस्थापक सौ. अमृता कुलकर्णी उपस्थीत होते.
मेळाव्यामध्ये बँकेच्या लघुउद्योजकांसाठी असणा-या कर्ज योजना व इतर कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. लघुउद्योजक संघटनेचे, इंडस्ट्रियल प्रिमायसेसचे पदाधिकारी व इतर लघुउद्योजकांनी त्यांना भांडवल उभारणी साठी, कर्जासाठी येणा-या अडचणी, शंका व अपेक्षा यावर सखोल चर्चा केली व त्यावर बँकेकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. शिवाय विश्वेश्वर बँक नेहमीच मदतीला धावून येते असे वक्तव्य काही कर्जदारांने केले. मेळाव्यामध्ये श्री. ढवळेश्वर सर यांनी व्यवसाया बरोबरच स्वतःच्या आरोग्याबाबत व मुलांच्या संस्काराबाबत योग्य ते मार्गदर्शन व सुचना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरव्यवस्थापक श्री. मिलींद केळकर व आभार प्रदर्शन सहाय्यक सख्यव्यवस्थाक सौ. अमृता कुलकर्णी यांनी केले.